पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना अपचन, अॅसिडीटी, पोट साफ न होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं असा त्रास होत असतो. आज आपण या सगळ्या समस्यांसाठी एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. वजन नियंत्रणात राहण्यासाठीही याचा फायदा होतो.
अनेक समस्यांवर एकच उपाय- हिंगाचं पाणी
हिंगाचं पाणी महिला आणि पुरुष असं दोघांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे शरीराला अनेक फायदे होतात. हिंगाचं पाणी तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.
– एक ग्लास पाणी गरम करा– हे पाणी गरम झाल्यानंतर त्यात हिंग टाका– आता हे हिंग पाण्यात चांगलं मिक्स होऊ द्या.– तुमचं हिंगाचं पाणी तयार आहे. – आता तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता.
काय आहेत हिंगाच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे ?
1) ब्लड प्रेशर – जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर आहारात हिंगाचा समावेश करणं जास्त फायदेशीर होईल. कारण हिंगामुळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. रक्ताच गिठळ्या होत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत राहतो. लो ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही कमी होते.
2) पचनक्रिया व्यवस्थित राहते – जर पोट साफ न होण्याची समस्या येत असेल तर हिंगात थोडं मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून रात्री झोपण्यापूर्वी याचं सेवन करावं. यामुळं पोट साफ होतं. पचनक्रिया चांगली राहण्यास याची मदत होते. अन्न पचन नीट झाल्यानं गॅस, पोटदुखी अशा समस्या येत नाहीत. वजन सुद्धा नियंत्रणात राहतं.
3) दातांच्या समस्या – हिंगामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. यामुळं दातांना लागलेली किड दूर होण्यास मदत होते. जर दातांमध्ये वेदना होत असेल किंवा एखादा बॅक्टेरिया तुमच्या दातांना त्रास देत असेल तर त्या वेदनाही यामुळं दूर होतात. जर दात दुखत असतील तर हिंगाचा तुकडा दातांखाली ठेवा यामुळं दातदुखीत आराम मिळेल.
4) मासिक पाळीतील वेदना दूर होतात – मासिक पाळीतील वेदना, अति रक्तस्त्राव, अनियमित मासिक पाळी अशा अनेक समस्यांमध्ये हिंग फायदेशीर ठरतं. हिंगात असे घटक असतात ज्यामुळं महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचं प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळं अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते.
5) सर्दी-खोकला दूर होतो – सर्दी, खोकला अशा लहान मोठ्या आजारांपासून वाचण्यासाठी हिंगाचा खूप फायदा होतो. हिंग, मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचं मिश्रण घेतलं तर सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करू शकता.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.